एक ग्राम ची मासोळी,बिचारीच्या पोटात ट्यूमर !!!
ब्रिटन येथील ब्रिस्टल मधील वेट्स वेटरनरी हॉस्पिटल मध्ये मॉली जातीच्या एका गोड फिश च्या पोटात असलेल्या ट्यूमरच्या एका गाठीचे ऑपरेशन करण्यात आले.वेटस् हॉस्पिटलच्या सोनिया माइल्स ने सांगितले कि ही सोनेरी मासोळी (मालकाचे नाव सांगण्यात आले नाही) एका ब्रिस्टल मध्ये रहाणाऱ्या एका गृहस्थाला त्याच्या शेजार्याने ही फक्त ₹ ८९ किंमती ची छोटीशी मासोळी,भेट म्हणून दिली होती.काही दिवसातच त्या गृहस्थाचे ह्या छोट्या सोनेरी मासोळीवर अतिशय जीव जडला. पण दोन तीन आठवड्यानंतर त्याने पाहीले कि ती चिमुकली हळू हळू खाणे पिणे सोडून, मरगळायला लागली. तत्काळ त्या गृहस्थाने तिला ब्रिस्टलच्या वेट्स वेटरनरी हॉस्पिटल मध्ये आणले. हा पेशंट हॉस्पिटलचा आता आता पर्यंतचा सर्वात लहान पेशंट होता, वजन फक्त एक ग्रॅम !! तिला तिथल्या रेसिडेंट सर्जन ने चिमुकल्या प्राण्यांच्या सर्जरी मध्ये नेले. बाह्य लक्षणां मध्ये तिथे पोटाचे मध्यभागी एक छोटासा उभार दिसून येत होता,पण स्कैन मध्ये असे दिसून आले कि तिच्या मुखविवराच्या शेवटी एक गाठी सारखा ट्यूमर झाला होता.सर्जन ने तिचे तत्काळ ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. प्रथम गोल्डफिशला शांत करण्यासाठी तिला पाण्याच्या मोठ्या टब मध्ये ठेवण्यात आले. ती थोडी शांत झाल्या नंतर तिला ऑपरेशन टेबलवर (म्हणजेच एका काचेच्या मोठ्या खोलगट पेट्री डिश मध्ये) घेण्यात आले!
तिला नीट श्वसन करता यावे म्हणून पेट्री डिश मध्ये पाण्याची सतत धार सोडण्यात आली. चाळीस मिनिटे चाललेल्या या ऑपरेशन मध्ये सर्जन्सनी अति सूक्ष्म एण्डोस्कोपी द्वारे तो ट्यूमर काढण्यात आला, व त्या जागेला जलरोधी सिमेंट पेस्ट द्वारे सील करण्यात आले.
नंतर तिला अधिक ऑक्सिजन असलेल्या पाण्याच्या जार मध्ये सोडण्यात आले. थोड्या वेळाने तिचा मालक ₹ ८९१२ भरून घरी घेऊन गेला.
भाग्यवान ती मासोळी !! आणि त्या पेक्षा सुद्धा धन्य तिचा मालक.अर्थात,ह्या सर्वां बरोबरच हे सर्व शक्य करण्या करता जी आधुनिक अतिसुक्ष्म यंत्रे व आॅपरेशनची वैद्यकीय उपकरणे तयार करणारे वैज्ञानिक आणि अशा वैद्यकीय उपकरणां द्वारे सूक्ष्म एण्डोस्कोपिक सर्जरी करण्यात निष्णात सर्जन्स , हे सर्वच अशा नवल कथांचे हीरोज असतात.
***********************
अप्रतिम, सर आता आपण आपला ब्लॉग शेअर करायला काय हरकत आहे. ही पोस्ट अतिशय सुंदर आहे. मागच्या दोन तीन दशकात तंत्रज्ञानाने खूप मोठी भरारी घेतली आहे. खूप प्रगत झाले आहे. विशेष करून सूक्ष्म तंत्रज्ञानामधे चांगली प्रगती केली आहे.
LikeLike