गुरुजी– एक विडंबन

गुरुजी– एक विडंबन

गुरुजींवर एक छान छान कविता ऐकली,
अशा कविता मधून मधून वाचल्या कि थोडे बरे वाटते,
एखाद दिवस हायपर टेन्शन ची गोळी , चुकवली तरी चालते !

शिक्षक म्हणजे काय,हे रिकाम्या खिशाला कळते,
रात्रंदिवस ‘उद्या काय’ ची
भिति त्याला छळते !
‘मागता येईना भीक – तर मास्तरकी तरी शीक’
शेवटी मराठीची ही म्हणच जगात खरी ठरते !!

‘गुरुपौर्णिमा’ ला झूल मात्र घालतात,
समाजाच्या बैलांचा पोळा समजून
पुरणपोळी चारतात !
पाच सेप्टेंबरला हारतुऱ्यांनी, मनाची शिंगे रंगवितात,
गुरुर् ब्रह्मा,गुरुर् विष्णुचा श्र्लोक जोरात गातात
घरी येऊन गुरुजी गपचिप, पिठलं भात खातात।
*************************

सभ्य

एकीकडे आपण विश्र्व आदिवासी दिवस साजरा करतो…….
……जणु आपण ते कधी *सभ्य* होतील, हे पहात आहोत, ……..
……आणि आदिवासी , तथाकथित सभ्य समाजातील आपण केव्हां *माणूस* होण्या ची वाट पाहत आहेत !!!
😳☹☹ मला तरी ही बातमी वाचून असेच वाटले.
*”सांगलीत एकीकडे पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूर परिस्थितीमुळे अनेकांचा संसार उद्ध्वस्थ झाले आहेत. अशा भीषण परिस्थितीतही चोरांनी पुरामुळे घर सोडून गेलेल्या घरांवर डल्ला मारला आहे. सांगलीत महापुरात अनेक घरं पाण्यात बुडाली आहेत. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक घर सोडून सुरक्षितस्थळी रवाना झाले. या गंभीर परिस्थितीतही संधी साधत चोरट्यांनी डाव साधला आणि घरातील टीव्ही, फ्रिज यासारख्या अनेक वस्तू लांबवल्याचं समोर आलं आहे.खरोखर ही अतिशय शरमेची बाब आहे”.*

…. विचार करा,असभ्य कोण ???? 😢😟